
अमळनेर : तालुक्यातील जुनोने येथील २७ पासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा पाटचारी मध्ये मृतदेह आढळल्याची घटना १ रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली.

दत्तू लोटन पाटील वय ३५ हा तरुण २७ फेब्रुवारीपासून घरातून काही एक न सांगता निघून गेला होता. १ रोजी त्याचा मृतदेह पाटचारीत तरंगताना आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनस्थळी पंचनामा केला असून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




