
अवजड वाहनांची वाहतूक ढेकू सारबेटा मार्गाने होणार
अमळनेर:-तालुक्यातील चांदणी कुर्हे-धरणगाव रस्त्यावरील सती माता मंदिराजवळील रेल्वे बोगदा क्रमांक 37 हा अमळनेर धरणगाव रस्ता दुरुस्तीसाठी दिनांक 9 मार्च ते 22 एप्रिल 2026 पर्यंत 45 दिवस बंद राहणार बंद असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

याबाबत रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनिअर पंकज पी.हादेकर यांनी दिनांक 4 मार्च 2026 रोजी अमळनेर तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी,बांधकाम विभाग,अमळनेर एस टी आगार प्रमुख,चांदणी कुर्हे सरपंच,रेल्वे सुरक्षा बल, अमळनेर,मंडल अभियंता व रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर,अमळनेर यांना पत्र दिले आहे.यानुसार
अवजड वाहनांची वाहतूक ढेकू सारबेटा पर्यायी मार्गाने करायची असून केवळ लहान वाहने पूल क्रमांक 325 च्या खालून नेण्याची व्यवस्था असणार आहे.




