
अमळनेर:-शहरातील मोठ्या गटारीत पडलेल्या कुत्र्यास अमळनेर पालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे.

बालेमिया जवळ गटारी मध्ये सदर कुत्रा पडलेला असल्याचे दूरध्वनीने कुसुमताई भाटिया यांनी पालिकेला कळविल्याने अग्निशमन बचाव पथकाचे मुख्यअधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर कुत्र्यास सुखरूप बाहेर काढून भाटिया यांच्याकडे सुपूर्त केले. नागरिकांनी अग्निशमन विभागाचे कौतुक केले.अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे,कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे,जफर पठाण,सत्येनं संदानशिव यांनी परिश्रम घेतले.




