
अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात
अमळनेर:-तालुक्यातील सारबेटा येथील सबस्टेशन जवळ सामाजिक वनीकरण विभागाच्या झाडांना काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

आगीचे स्वरूप वाढत असताना अमळनेर पालिकेला कळविण्यात आल्याने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशाने अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी जाऊन पोहोचले, व तातडीने संपूर्ण आग विझविण्यात यश आले. अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी, कर्मचारी फारुक शेख, भिका संदानशिव आकाश बाविस्कर यांनी यासाठी परिश्रम घेतले.




