
अमळनेर : माझ्याकडे पाहून का हसत होता या कारणावरून एकाने दुसऱ्याला फायटरने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे १३ रोजी रात्री १० वाजता बसस्टँड समोर घडली.
नेताजी वसंत पाटील हे १३ रोजी शेतातून घरी मोटरसायकलने जात असताना बसस्थानक जवळ नितेश पंकज पाटील याने त्यांना अडवून त्यादिवशी माझ्याकडे पाहून का हसत होता असे विचारून रागात मोटरसायकलला लाथ मारली आणि खाली पाडले. त्यांनतर फायटरने डाव्या डोळ्याला मारून जखम केली. नेताजींच्या डोळ्यातून रक्त वाहत असताना त्याला लाथा बुक्क्यांनी पोटावर ,पाठीवर पायावर मारहाण केली. अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. नेताजीने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नितेश विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),२९६ ,१२६(२),११५(२) ,३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.




