
चेअरमनपदी भागवत पाटील तर व्हाइस चेअरमनपदी पुरुषोत्तम पाटील
अमळनेर:-येथील अमळनेर तालुका को. ऑप.फ्रुटसेल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड १३ रोजी संपन्न झाली असून चेअरमनपदी पाडळसरे येथील भागवत पाटील तर व्हाइस चेअरमनपदी कंडारी येथील पुरुषोत्तम पाटील यांची बिनविरोध निवड पार पडली.

सदर निवडीप्रसंगी जयेशकुमार काटे,नंदकिशोर नेरकर,प्रताप पाटील, प्रफुल्ल पाटील,श्यामकांत पाटील,युवराज पाटील, मंगलाबाई चौधरी, सुवर्णा पाटील,सुरेश पाटील, हिलाल सैदाणे, ज्ञानेश्वर धनगर हे संचालक उपस्थित होते. फ्रुटसेल सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर निवडीबद्दल भागवत पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ विलास पाटील, अलीम मुजावर, उमाकांत साळुंखे, वसंतराव पाटील, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




