
अमळनेर : भरधाव वाहनाने धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना १५ रोजी रात्री ९ वाजता दाजीबा नगर जवळ घडली.

शोभाबाई जयवंतराव पाटील वय ६५ ही महिला रात्री शतपावली करत असताना अचानक गळवाडे कडून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने महिला जागीच खाली पडली. घटना घडताच वाहनचालकाने आपले वाहन माघारी वळवून फरार झाला. नागरिकांनी शोभबाई याना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्रदीप आत्माराम पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१,१२५(अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




