
अमळनेर:- शहरात ईद-उल-फितरचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. शहरात अमन, शांती आणि भाईचारा वृद्धिंगत व्हावा या भावनेने गांधलीपुरा येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

ईदचा चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजता हाफिज अजहर नूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाजानंतर सर्वांनी अल्लाहकडे देशात कायम अमन, शांती आणि सौहार्द नांदावे यासाठी प्रार्थना केली. नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, माजी आमदार बी.एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविसकर, उपअधीक्षक विनायक कोते, पीआय दत्तात्रेय निकम, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शिंदे, जीतू ठाकुर, नगरसेवक राजू संदानशिव, साहेबराव पवार, कैलास पाटील, श्रीराम चौधरी, पंकज चौधरी, गुलाब पाटील, बाला संदानशिव, भरत पवार ,कांग्रेस चे भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपड़े,आदी मान्यवर उपस्थित होते. नमाजानंतर अनेकजण कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी दुआ केली. शहरभर ईदच्या आनंदात एकता आणि प्रेमाचे वातावरण दिसून आले. विविध भागात लहान मुले एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून सर्वांनी एकत्र येत शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.




