
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील यांनी सगळ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुस्लिम बांधवांना दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार आबासाहेब डॉक्टर बी एस पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवा तर्फे मारवड पोलीस स्टेशनची एपीआय जीभाऊ पाटील यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर , विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व्ही एन मुजावर, हाजी नईम मुजावर, बाबू पेंटर, जाकीर भाई, शेख नईम, पठाण सलादिन मुजावर, नासिर मुजावर, सत्तार मुजावर, राजीक मुजावर, शौकत सय्यद मुशिर मुजावर, अजीम मुजावर, जमील ड्रायव्हर, मुन्ना मिस्तरी आदी उपस्थित होते. गावातील माजी सरपंच गणेश पाटील यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले तर आभार व्हि एन मुजावर यांनी मानले.




