
अमळनेर : शिवीगाळ का केली म्हणत दारूच्या नशेत पतीला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीला धक्काबुक्की केल्याची घटना तालुक्यातील बहादरवाडी येथे २१ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली.

बहदरवाडी येथील नरेश देवानंद पाटील हे आपल्या पत्नीसोबत घरी जेवत असताना दारुच्या नशेत रमेश प्रभाकर पाटील हा हातात लोखंडी रॉड घेऊन ,त्याच्यासोबत त्याचे वडील प्रभाकर नामदेव पाटील व मुलगा हेमंत रमेश पाटील हा लाकडी दांडका घेऊन घराचा ओटा चढून आले. व फाट्यावर मला शिवीगाळ का केली असे म्हणत रमेशने नरेश याला शिवीगाळ करत वाद घालू लागला. प्रभाकर व हेमंत यांनी धरून ठेवले आणि रमेशने लोखंडी रॉड ने खांद्यावर मारले. पत्नी भांडण आवरायला गेली म्हणून तिलाही धक्काबुक्की केली. पत्नीची बहीण आवरायला आली तिलाही शिवीगाळ करत तिघांनी तुम्हाला सोडणार नाही म्हणत दमबाजी केली. नरेश च्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४) ,११५(२) , ३५१(२) ,३५२ ,३५५ ,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




