
अमळनेर : सायकल पायी लोटत घेऊन जाणाऱ्या वृद्धाला मागाहून येणाऱ्या क्रेन ने उडवल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीजवळ घडली. दरम्यान रहिवाश्यांनी वाळूच्या डंपरने उडवल्याचे सांगत पोलीस प्रशासन आणि प्रवाश्याना वेठीस धरले.

जयरामदास धर्मानी नावाचा वृद्ध अमळनेर शहरकडून सिंधी कॉलनिकडे सायकल हातात घेऊन पायी जात असताना एक मोठी क्रेन वेगाने वृद्धाला उडवून पुढे निघून गेला. थोड्या वेळाने कोणीतरी अफवा उठवली की वाळूच्या बिना नंबरच्या डंपर ने उडवले म्हणून स्थानिक रहिवाश्यांनी संताप व्यक्त करत वृद्धाचे शव तेथेच ठेवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. वाहतुकीची कोंडी झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक मोकळी करण्याचे आवाहन केले. त्यावेळी आंदोलकांनी वाळूचे डंपर बंद करा अशी मागणी केली. निकम यांनी आम्हाला वाळूचे डंपर बंद करण्याचा अधिकार नाही ज्या वाहनाने अपघात केला त्याच्यावर कारवाई होईल असे सांगितले. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी बाजूच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात वृद्धाला क्रेन ने उडवल्याचे दिसत होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी व्हिडीओ आंदोलकांना दाखवताच आंदोलक नरमले. थोड्यावेळाने गैरसमज दूर होताच वृद्धाचे शवं विच्छेदनासाठी नेण्यात आले
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , उपनिरीक्षक कविता ठाणगे, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,संजय बोरसे , विनोद संदानशिव , सिद्धांत शिसोदे , रवींद्र बोरसे ,रवी पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तापी प्रकल्पाच्या उपसा योजनेच्या कामासाठी जाणारे क्रेन असल्याची माहिती असून ड्रायवर क्रेन गांधली शिवारात सोडून पळून गेला होता. तपासाधिकारी हेडकॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी क्रेन जप्त केले आहे




