
अमळनेर : दि. २६ मार्च रोजी रामनवमी तसेच माता सप्तश्रृंगी गड यात्रेनिमित्त पायी जाणाऱ्या भाविकांसाठी लायन्स क्लबच्या वतीने मंगरूळजवळील ग्यानीच्या ढाबा समोर सेवा प्रकल्प राबविण्यात आला. संध्याकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली.

या सेवा उपक्रमांतर्गत सप्तश्रृंगी गडाकडे पायी प्रस्थान करणाऱ्या भक्तांना आवश्यक अशा प्राथमिक उपचार साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पेन किलर औषधे, मलम, ट्यूब, गोळ्या यांसह उष्णतेपासून दिलासा देणारे थंड चिंचेचे पाणीही भाविकांना देण्यात आले. लांब पल्ल्याचा पायी प्रवास करताना होणारा शारीरिक त्रास कमी करण्यासाठी या उपक्रमाचा भाविकांना मोठा आधार मिळाला.
लायन्स क्लबचा हा सामाजिक उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला. सेवा आणि मानवतेची जपणूक करत भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र पारख यांच्यासह दिलीप गांधी, पंकज मुंदडा, रजनीश सासनानी, प्रशांत सिंघवी, योगेश मुंदडा,बाळू कोठारी,रविंद्र कॉलरा विनोद अग्रवाल, निरज अग्रवाल,एसदी भरुचा,प्रदीप अग्रवाल, राजू न्हाडा, प्रदीप जैन, मनिष जोशी,शेखर धनगर आदींसह असंख्य सदस्य उपस्थित होते.




