
अमळनेर : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने उल्लेखनीय यश संपादन केले. या संघातील प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू रोहित सर्जेराव पाटील (टी.वाय.बी.ए.) याची ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रोहितच्या या यशामुळे महाविद्यालयासह अमळनेर शहराचा गौरव झाला असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खा. शि. मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष माधुरी पाटील, कमल कोचर, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष सीए निरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, जेष्ठ संचालक हरी भीका वाणी, संचालक योगेश मुंदडा, डॉ. संदेश गुजराती, प्रदीप अग्रवाल, पंकज मुंदडे, संचालिका लिना पाटील, मंडळ सचिव प्रा. पराग पाटील, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील आदी मान्यवरांनी रोहितचे कौतुक केले.
तसेच प्रा. पराग पाटील, डॉ. ए. जे. पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. योगेश तोरवणे, सीसीएमसी प्रमुख डॉ. विजय तुंटे, जिमखाना समन्वयक प्रा. डॉ. संदीप नेरकर, आयक्यूएसी प्रमुख डॉ. मुकेश भोळे, क्रीडा संचालक व व्यवस्थापक प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, रजिस्ट्रार राकेश निळे, प्रा. अर्चना पाटील, सचिन वाघ, संजय पवार, प्रशांत देवकते तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व खेळाडूंनी रोहितला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




