
आरोपी भूषण महाजन याला भल्या पहाटेच अटक…
अमळनेर: शहरातील अमलेश्वरनगरमधील गोळीबार प्रकरणी मयताचा मित्र भूषण देविदास महाजन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषणला अटक करण्यात आली आहे.

अमलेश्वर नगर मधील अरुण सुरेश महाजन याचा भूषण देविदास महाजन यांच्या घरात गोळी लागून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , एपीआय रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , मिलिंद सोनार , सुनील तेली ,प्रशांत पाटील ,उज्वल म्हस्के , विनोद संदानशिव , सूर्यकांत साळुंखे ,नितीन मनोरे ,शेखर साळुंखे आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहचले. भूषण च्या घराची झडती घेऊन काही नमुने तपासण्यात आले.
🟩 रात्री उशिरा अरुण चा भाऊ नरेंद्र याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माझा भाऊ अरुण याने २७ रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पत्नीला दवाखान्यात आणून पायी चालत मित्र भूषण देविदास महाजन यांच्या घरी गेला. थोड्या वेळात मित्राचा फोन आला की तुझा भाऊ चक्कर येऊन पडला आहे. भूषण च्या घरी गेल्यावर तेथे गर्दी जमली होती. जमलेल्या लोकांनी सांगितले की तुझ्या भावाला भूषण ने गोळी मारून ठार केले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.
🟫 दरम्यान हा कट्टा कोणाचा, कोठून आणला आणि शहरात अजून किती कट्टे आहेत याचा पोलीस सखोल तपास करीत आहेत. भूषण याला पहाटेच अटक करण्यात आली आहे




