
अमळनेर : आर के नगर मध्ये विहिरीत पडलेल्या गायीला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढून गायीची सुटका केली.

३० रोजी सकाळी ७ वाजता नगरसेवक महेश देशमुख यांना कळले की आर के नगर भागात खुल्या जागेत असलेल्या विहिरीत एक गाय पडली आहे. त्यांनी तातडीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवून अग्निशमन दलाचे गणेश गोसावी , दिनेश बिऱ्हाडे , मच्छीन्द्र चौधरी , भिका संदानशीव ,समाधान केदार , आनंद बैसाणे ,अक्षय अहिरे , राकेश शिरसाठ यांनी विहिरीत दोर टाकून गायीला बाहेर काढले.




