
अमळनेर : तहसीलदारांनी अमळनेर शहरातल्या विकासकामांबाबतची गौण खनिज रॉयल्टी ४७ लाख रुपये वसूल केली असून तहसील विभागाने देखील पालिकेची थकबाकी भरावी अशी मागणी माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांनी केली आहे.

पालिकेत होत असलेल्या रस्ता , बांधकाम , खोदकाम व इतर कामांची गौण खनिज रॉयल्टी तहसील विभागाकडे भरावी लागते. मार्च अखेर असल्याने प्रत्येक विभाग वसुलीसाठी मागे लागला आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रत्यक्ष पालिकेत जाऊन रॉयल्टी पोटी ४७ लाख रुपये वसूल केले आहेत.
दरम्यान पालिकेचे देखील तहसील कार्यालय , धान्य गोदाम यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर अशी २ लाख८६ हजार ३३८ रुपये थकबाकी आहे. मार्च अखेर असल्याने पालिकेची देखील वसुली मोहीम सुरु आहे. पालिकेची ९० टक्के वसुली होईल तरच विकासकामे होतील.म्हणून तहसीलदारांनी पालिकेची थकबाकी भरावी अशी मागणी करण्यात आहे




