
अमळनेर : मानतेला जाणारी पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जैतपिर येथे ३ रोजी रात्री ९:३७ वाजेला घडली. सहा जणांना उपचारसाठी धुळे रवाना करण्यात आले.

तालुक्यातील जैतपिर येथे वळणाजवळ गती रोधक आहेत. मानते साठी जाणाऱ्या एका पिकअप व्हॅन मध्ये २० -२५ जणापेक्षा जास्त लोक बसलेले होते. समोरून ट्रक आल्याने पिकअप व्हॅन वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि अचानक व्हॅन उलटी होऊन सर्व प्रवाशी खाली कोसळले.
त्यातील अंकुश भगवान बागुल वय २० रा वैजापूर ता सिंदखेडा,राकेश प्रकाश मोरे वय 20 रा वैजापूर , बादल गुलाब भिल वय १९ रा मुडी , संजय बापू मोरे रा वय २२ ,गणेश ताराचंद भिल वय २१ रा वैजापूर ,मेलसिंग जयंसिग कुवर वय २२ रा वैजापूर याना हात ,पाय ,पाठ आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना धुळ्याला रवाना करण्यात आले तर विजय दिलीप पवार वय २२ , राकेश सुखराम भिल वय २३ , रोहित भिल वय १८ तिन्ही रा वैजापूर , नागेश मंगल भिल वय २० रा ज्योयदा ता शिरपूर , तर सनी श्याम भिल वय १८ रा माळीच ता शिरपूर यांच्यावर अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.




