
अमळनेर : महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण करून पतीच्या डोक्यात बॅट मारून जखमी केल्याची घटना २९ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास डीडी नगर भागात घडली.

डीडी नगर भागातील महिला संध्याकाळी अंगण झाडण्यासाठी आली असता बाहेर उभा असलेला संजय देविदास खैरनार हा एकसारखे टक लावून पाहत होता आणि डोळ्याने इशारा करत होता. महिलेने ही घटना त्याच्या पत्नीला सीमा खैरनार ला सांगितले असता ते दोघे मागाहून महिलेच्या घरात घुसले संजय खैरनार याने महिलेला अंगावर ओढून तिचा विनयभंग केला व तिला मारहाण केली. महिलेचा पती भांडण आवरायला गेले असता संजय याने त्यांच्या डोक्यात बॅट मारण्याचा प्रयत्न केला तो वार महिलेच्या पतीने हातावर झेलल्याने दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भारतीय न्यायासंहित कलम ७४,७९, ११७ ,११८(१), २९६ ,३३३, ३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




