
अमळनेर : शॉर्ट सर्किट होऊन झोपडी जळून खाक आणि शॉक लागून गाय मेल्याची घटना तालुक्यातील एकरुखी येथे ४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

विष्णू भालचंद्र भिल हे ४ रोजी दुपारी १ वाजता घराजवळील झोपडीत गुरांना पाणी पाजून घरी परत आले. अर्ध्या तासाने शेजारील लोक पळत आले आणि त्यांनी आरडाओरड केली की पळा पळा तुमच्या झोपडीला आग लागली आहे. विष्णू याने घटनास्थळी जाऊन पाहिले असता विद्युत तारा त्यांच्या झोपडीवरून गेलेल्या आहेत. शॉर्ट सर्किट झाले असून गायीला देखील शॉक लागल्याचे व्रण दिसून आले. गावकऱ्यांनी आग विझवून आटोक्यात आणली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




