
अमळनेर-शहरातील बोरी नदी काठी असलेल्या वर्णेश्वर
महादेव मंदिराजवळ काल दिनांक 10 रोजी अंदाजे 60 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे-बांधा – सडपातळ,अंगात निळ्या रंगाचे ब्लॉऊस व आकाशी रंगाची साडी,पांढऱ्या रंगाचा परकर,पायात मेहंदी रंगाची चप्पल,केस काळे, सोनेरी रंगाचे,कानात पिवळ्या धातूचे कर्नफूल, गळ्यात काळ्या मनीची पोत त्यात पिवळ्या धातूचे रामफूल, नाकात फुली सोबत तपकिरी रंगाचे पाकीट हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या,उजव्या हाताच्या बोटात तांब्याची अंगठी आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर मृतदेहाचा पंचनामा केला.याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.




