
अमळनेर:- तालुक्यातील जुनोने शिवारातील गट नं. 122/1 मधील 2 बिघे मका शॉर्ट सर्किट झाल्या मुळे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली.

टाकरखेडा येथील जयश्री मनोहर पाटील यांच्या मालकीचे सदर शेत असून या आगीमुळे त्यांचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले, शेतातील विजेच्या खांब्यावरून आगीची ठिणगी पडल्याने खाली असलेल्या मक्याला आग लागली, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान टाकरखेडा वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पाहणी केली असून महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी शनिवारी भेट देणार असल्याची माहिती आहे. दरम्यान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे




