
व्यापारी बांधवांची मागणी, आमदारांसह पोलीस प्रशासनास दिले निवेदन
अमळनेर(प्रतिनिधी )येथील न्यू प्लॉट भागातील रिषभ फर्निचरचे मालक प्रतीक जैन यांना दुकानात घुसून झालेली मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संबंधित पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहरातील व्यापारी बांधवांनी करीत आमदारांसह पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे.

यात म्हटले आहे की दिनांक 31 मार्च 2026 रोजी प्रतीक जैन व त्यांचे वडील कैलास जैन दुकानात असताना संजय दुसाने नामक व्यक्ती व त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेने दुकानात येऊन पैशांची मागणी करत प्रतीक जैन यास मारहाण आणि शिवीगाळ करून दुकानात नासधूस केली तसेच कैलास जैन यांच्याशीही हुज्जत घातली,या घटनेत प्रतीक यांच्या हाताला थोडी जखमही झाली आहे.प्रत्यक्षात जैन यांचा दुसाने यांच्याशी शेताचा अथवा इतर कोणताही व्यवहार झालेला नसताना विनाकारण पैशाची मागणी व मारहाण झाल्याचा आरोप जैन यांनी करीत अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली.पोलीस ठाण्यात देखील संबधीत महिलेने प्रतीक यांना धमकी दिली आहे.
सदर प्रकरणी पोलिसानी न्याय न दिल्याने शहरात व्यापारी बांधवाची बैठक होऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच या घटनेने व्यापारी दहशतीत असल्याने संबंधित व्यक्तिविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन देऊन अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
सुरवातीला आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी माजी नगराध्यक्ष सौ जयश्री पाटील यांनी निवेदन स्वीकारत व्यापारी बांधवाना धीर दिला.यावेळी मार्केट सभापती अशोक पाटील,एल टी पाटील,जितेंद्र ठाकूर व चेतन राजपूत उपस्थित होते. त्यानंतर डीवायएसपी विनायक कोते व पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बिपीन कोठारी, प्रकाशचंद पारेख,मोहनलाल जैन, प्रा.ओस्तवाल,विनोद अग्रवाल,राजेंद्र झाबक,भरत कोठारी,डॉ रवींद्र जैन, बाळू कोठारी,कैलास लोढा,चेलाराम सैनानी,रिषभ पारेख,किशोर लुल्ला, श्रीराम चौधरी,अभिजित बेदमुथा, हर्षल बोरा,विनोद पारेख,राजेंद्र झाबक,गौरव छाजेड,निलेश ओस्तवाल, पप्पु जैन,राजेश बेदमुथा, कीर्ती कोठारी,गोकूळ पारेख,दिनेश लोढा,रोहित सिंघवी,प्रफुल सिंघवी,आनंद जैन,देवेंन कोठारी, प्रकाश जैन,संदेश जैन यासह असंख्य व्यापारी बांधव उपस्थित होते.




