
अमळनेर : पाण्याच्या टाकीचाच व्हॉल्व्ह खराब झाल्याने सुमारे ८० हजार लिटर पाणी जमिनीवर सोडून द्यावे लागण्याची नामुष्की पैलाड भागतील साईबाबा नगर मध्ये घडली.

पैलाड भागात टाकी मधून पाणी खाली सोडण्यात येणारा मुख्य व्हॉल्व्ह मध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्याला दुरुस्त करण्यासाठी व्हॉल्व्ह काढावा लागणार होता. व्हॉल्व्ह काढल्याने टाकीतील ८० हजार लिटर पाणी नाईलाजास्तव सोडून द्यावे लागले. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने परिसरात चिखल झाला होता. बायपास करून पुढे पाणी पुरवठा करण्यात आला.
तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी सोडल्याशिवाय पर्याय नव्हता. व्हॉल्व्ह दुरुस्ती करून टाकी भरून त्या भागाला नियमित पाणी पुरवठा केला जाईल-सत्येम पाटील , अभियंता ,अमळनेर नगरपरिषद




