
अमळनेर:- येथील अर्बन बँकेकडून अपघाती निधन झालेल्या सभासदाच्या वारसाला नुकताच विमा क्लेम प्रदान करण्यात आला.
दि अमळनेर को ऑप अर्बन बँकेचे सभासद व कर्जदार राजेंद्र नारायण सुतार यांचे अपघाती निधन झाले. बँकेतर्फे त्यांचा युनायटेड इंडिया इन्सू. कंपनीकडे १ लाख रकमेचा विमा काढण्यात आला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता. क्लेम मंजूर झाल्याने वारस सरलाबाई राजेंद्र सुतार यांना बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सभासद, विमा प्रतिनिधी सिंघवी यांच्या उपस्थितीत क्लेम प्रदान करण्यात आला.







