
मागासवर्गीय निधीमधून सामाजिक सभागृहास गोदरेज कपाट भेट
अमळनेर:- तालुक्यातील लोण बुद्रुक ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येऊन 20 टक्के मागासवर्गीय निधीमधून सामाजिक सभागृहास गोदरेज कपाट ग्रामपंचायतीकडून देण्यात आले.

त्यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य भटू आनंदा संदानशीव, पोलीस पाटील नालंदा शरद खैरनार सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र युवराज पाटील,शरद अशोक खैरनार, शेखर अशोक खैरनार प्रवीण दादाभाऊ संदानशिव, नाना अभिमान खैरनार, दत्तू बाबुराव खैरनार ॲडव्होकेट विजय भटू संदानशीव , सुनील शिवलाल खैरनार, प्रशासक श्री राजेंद्र दामू सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री.ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे ग्रामरोजगार सहाय्यक श्री.यशवंत बंडू पाटील संगणक परीचालक श्री अशोक साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.




