
अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेर येथील पक्ष कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी पक्ष कार्यालयासमोर सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती.ध्वजारोहणानंतर भागवत पाटील यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्याचा आढावा मांडत त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. अमळनेर मतदारसंघात आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढली, याची माहिती कार्यकर्त्यांना देत भविष्यात सर्व संस्थावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.या प्रसंगी “राष्ट्रवादीचा जयघोष” करण्यात आला. कार्यक्रमाला जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय सेलच्या प्रदेश पदाधिकारी सौ रिता बाविस्कर,लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्रा मंदाकिनी भामरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा सुरेश पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत,कार्याध्यक्ष सुनिल काटे,विनोद कदम,शेतकी संघ संचालक संजय पुनाजी पाटील, विक्रांत पाटील,रणजित पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, युवक शहराध्यक्ष पंकज साळी,शिवाजीराव पाटील,कामगार नेते एल टी पाटील,जितेंद्र ठाकूर,माजी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,नगरसेवक नरेन्द्र संदानशीव,भरत ललवाणी,सचिन पाटील, अलीम मुजावर,चंद्रकांत पाटील,भूषण पाटील, सनी गायकवाड, सौ भारती शिंदे, योगेश पाटील, राहुल गोत्राळ,महारु पाटील, हिंमत पाटील,निलेश देशमुख, तसेच बाजार समिती व शेतकी संघाचे पदाधिकारी, आजी माजी जि प आणि प स सद्स्य व आजी माजी नगरसेवक, ग्रामीण व शहरी भागातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि जनसेवेच्या ध्येयासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.




