
अमळनेर : तालुक्यातील सडावण चाकवे शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या ४० हजार रुपये किमतीची ६ गुरे अज्ञात चोरट्यानी ५ रोजी रात्रीपासून तर ६ रोजी सकाळ दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.

प्रताप श्रीकृष्ण पाटील रा सडावण यांनी फिर्याद दिली की चाकवे शिवारातील त्यांच्या गट नम्बर १६९ मधील शेतातून एक सहा हजार रुपये किमतीची गाय तथा गट नम्बर ६८ मधील शेतातील संदीप पाटील यांच्या मालकीचे ३४ हजार रुपये किमतीचे दोन बैल आणि तीन गायी अज्ञात चोरत्यांनी शेतातून चोरून नेले. ६ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत.




