
अमळनेर : येथील नायब तहसीलदार सी यु पाटील यांचे सुपुत्र डॉ प्रसाद पाटील यांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी त्याचा सत्कार केला आहे.

डॉ प्रसाद याने वेदांत मेडिकल कॉलेज डहाणू येथून एमबीबीएस उत्तीर्ण केले आहे. सत्कार प्रसंगी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , डीवायएसपी विनायक कोते , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , सी यु पाटील व महसूल कर्मचारी उपस्थित होते. प्रसाद याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




