
अमळनेर : वडा पाव च्या गाडीवर येऊन धिंगाणा घालून एकाच्या गळ्यातील १५०० रुपये किमतीची चांदीची चैन तिघांनी हिसकावून नेल्याची घटना ६ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.

गणेश प्रवीण पवार रा कुलगुरू मंगल कार्यालयाच्या मागे याच्या भावाची गंगाघाट येथे वडापाव ची गाडी असून ६ रोजी संध्याकाळी गौरव कैलास सोनार ,हर्षल बागुल उर्फ बंटी शिंपी दोघे मोटरसायकलवर आले आणि जोरजोरात शिवीगाळ करून मोटरसायकल रेस करत होते. काही वेळाने ते निघून गेल्यानन्तर भाऊ शिवम याने कैलास सोनार याना त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करून वडिलांसोबत पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले. थोड्या वेळानंतर पुन्हा गौरव , हर्षल आणि दीपेश उर्फ बंटी महाजन तिघे मोटरसायकलवर आले त्यावेळी गणेशने व्हिडीओ काढण्यासाठी मोबाईल चालू केला असता तू व्हिडीओ का काढतो म्हणत मोबाईल हिसकावू लागले. लगेच दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. गौरव ने गचांडी पकडून तुझ्या दुकानांचे नाव किंग वडा पाव आहे म्हणून तुम्ही बादशहा झाले का असे म्हणत तिघे अमळनेरचे बाप आहोत , कट्ट्याने तुमच्या दोघांचा गेम करून टाकू असे म्हणत गळ्यातील ३ भारची १५०० रुपयांची चांदीची चेन हिसकावून पळून गेले. गणेशने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलाम ११९(१),३५२,३५१(२) ,३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.




