
नागरिकांनी अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करावी- अमळनेर औषधी विक्रेता संघ
अमळनेर:- अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात व राज्यात संपुर्ण भारतभर औषध विक्रेत्यांना त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात दि.20 मे रोजी देशातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.त्यानुसार अमळनेर तालुक्यात देखील अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने बंद पुकारला आहे.

त्यामुळे अमळनेर शहरातील तालुक्यातील औषध दुकाने बंद राहणार आहे.त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य यांची आगाऊ व्यवस्था करून घ्यावी, असे आवाहन अमळनेर विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, आपत्कालीन सेवा सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवेसाठी अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी 9422278334, 8830975336, 9420651931 यावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रशांत पाटील व सचिव प्रवीण माळी यांनी केले आहे.
दरम्यान दिनांक 20 मे रोजी हा बंद असल्याने यादीवशी सकाळी 10.30 वाजता धुळे रोडवरील विजय मारुती मंदिरावर सर्व केमिस्ट बांधव एकत्रित येऊन तेथून तहसील कचेरी पर्यंत रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. सदर बंदच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नड्डा यांना पत्र दिले आहे.
ऑनलाइन औषध विक्री बंद करा,कॉर्पोरेटस द्वारे अव्यवसायिक डिस्काऊंट बंद करा,बनावट औषधीपासून देश वाचवा यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट यांनी हा बंद पुकारला असून जळगाव जिल्ह्यात जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झंवर यांनीही बंद चे आवाहन केले आहे.




