अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील एकाला गावातील सहा जणांनी मारहाण केल्याची घटना २६ रोजी घडली आहे.

फिर्यादी पंकज संजय कोळी (वय-25, धंदा-मजूरी, रा. मांडळ) हा २६ रोजी रात्री 09.30 वाजेच्या सुमारास मी जेवण करीत असताना गावात राहणारे रायबा देवराम कोळी, साहेबराव देवराम कोळी, वगा देवराम कोळी, आकाश वगा कोळी, अमोल साहेबराव कोळी, गणेश अशोक कोळी (सर्व रा. मांडळ) हे एकत्र येवून फिर्यादीच्या घरी आले व काही एक कारण नसताना शिवीगाळ करु लागले, शिवीगाळ का करीत आहे अशी विचारणा केली असता त्यांनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी रायबा देवराम कोळी याने फिरुडीच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला तसेच साहेबराव कोळी याने त्याचे हातातील लोखंडी सळईने खांद्याला मारुन दुखापत केली. वगा कोळी व आकाश कोळी यांनी काठीने खांद्यावर व पाठीवर मारहाण केली तसेच अमोल कोळी याने साखळीने फिर्यादीच्या तोडांवर जोराचा बुक्का मारुन दुखापत केली. गणेश कोळी याने चापटाबुक्यांनी पोटावर मारहाण केली आहे. त्यानंतर फिर्यादीचा भाऊ व वडील यांनी फिर्यादीची सुटका केली. फिर्यादीने उपचार घेऊन वरील सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पुढील तपास हेकॉ प्रवीण पारधी हे करीत आहेत.
