
अमळनेर:- साखरपुडा असल्याने मेकअप करण्यासाठी गेलेली २१ वर्षीय तरुणी ब्युटी पार्लरमधूनच निघून गेल्याची घटना २८ रोजी घडली आहे.
तालुक्यातील एका खेडेगावातील २१ वर्षीय तरुणीचा १ जून रोजी साखरपुडा असल्याने ती मेकअप करण्यासाठी २८ रोजी ११ वाजता चुलत भावासोबत अमळनेर शहरात ब्युटी पार्लरमध्ये आली होती. पार्लर मध्ये चार पाच तास लागणार होते. गावात लग्न असल्याने तरुणीला सोडून तिचा भाऊ लग्नाला निघून गेला. ४ वाजता चुलत भाऊ सदर तरुणीला घेण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी ती दिसून आली नाही. तिचा फोन ही बंद असल्याने नातेवाईकांना विचारून परिसरात शोध घेतला असता कोणताही तपास न लागल्याने तिच्या भावाने अमळनेर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोकॉ नितीन मनोरे हे करीत आहे.





