अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदी पात्रात सापडलेल्या अवैध डिझेल साठ्याबाबत योग्य तो खुलासा न आल्याने १४७० लिटर डिझेल शासन जमा होऊन तो विक्री करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी २९ रोजी काढले आहेत.

उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , मंडळाधिकारी कल्याणी पाटील , प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सावखेडा येथे वाळू ठेक्यांवर अचानक छापा टाकला असता गिरीश तुळशीराम बेलदार यांच्याकडे २८ रोजी सुमारे ७ कॅन मध्ये १ लाख ४२ हजाराचे १४०० लिटर डिझेल एक लाख ४२ हजार रुपयांचे व तीन कॅन मध्ये ७० लिटर असे एकूण एक लाख ५५ हजार रुपयांचा १४७० लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा महसूल पथकाला आढळून आला होता. महसूल पथकाने तो साठा जप्त करून अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दळलं केला होता. तसेच मालकाला कलम ६ प्रमाणे कारणे दाखवा नोटीस दिली होती. मात्र मालकाने मुदतीत खुलासा केला नसल्याने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तो साठा जप्त केला आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ६ व ६ अ प्रमाणे जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे याना प्राप्त झाले म्हणून हे डिझेल विक्री करण्यासाठी त्यांनी शहरातील सर्व पेट्रोल पंपावरचे डिझेल दर मागवले होते. त्यात धुळे रस्त्यावरील श्रीकृष्ण पेट्रोल पंप (नायरा) वरचे दर सर्वाधिक १०१.५७ रुपये आढळून आल्याने प्रशासनाने ते जप्त डिझेल त्यांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आलेली रक्कम क्रिमिनल डिपॉझिट (८४४३) या लेखाशीर्षकाखाली शासन जमा करण्याचे आदेश प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत.
