Oplus_131072
अमळनेर : मातंग समाजाचे असल्याने मुरूम टाकण्यास नकार देऊन जातीवाचक बोलून तिघाना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावर २९ रोजी दुपारी ३ वाजता घडली.

रेखा अरुण वाघ या महिलेने फिर्याद दिली की तळवाडे गावात शेत शिवारात पाईप लाईन चे काम सुरू होते. तेथे निघालेला मुरूम बाजूला टाकला जात होता. शिवाजी लोटन पाटील मुरूम दुसरीकडे टाकत होता. तेव्हा ती महिलेचे पती अरुण वाघ , दिर प्रवीण वाघ , संजय वाघ , लालचंद भिल , यशोदाबाई भिल त्याला बोलले की इकडे तिकडे टाकण्यापेक्षा नवनाथ बल्ल्यावर खड्ड्यांमध्ये तो मुरूम टाकून दे. त्याचा त्याला राग आला तुम्हाला मातंग व भिल्ल याना मुरूम टाकून देणार नाही ,इथे बल्ल्यावर राहू देणार नाही. तुमची चरबी राहू देणारा नाही तुम्हाला ट्रॅक्टरने मारून टाकू अशी धमकी दिली. थोड्या वेळात त्याने फोन करून गावातील लोटन मोतीराम पाटील ,उमेश लोटन पाटील आले व त्यांनी शिविगाळ केली. पती अरुण वाघ त्यांना बोलायला गेले असता त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारले. महिला सोडवण्यास गेली तेव्हा शिवाजी याने मारण्याच्या उद्देशाने महिलेचा हात ओढला आणि तिची बांगडी फुटून तिला जखम झाली. यशोदाबाई सोडवायला आली तिला देखील शिवाजी , लोटन व उमेश यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५ ,३५१(२) ,३५२ ,३(५) , अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१)(आर)(एस) प्रमाणे गुन्हा दाखलं करण्यात आला असून तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.
