
अमळनेर : तालुक्यात जानवे येथे एका तरुणाने विहिरीत आत्महत्या तर एकाने दहिवद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
तालुक्यातील दहिवद येथील राजेंद्र श्रावण माळी वय ३८ यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून आत्महत्या केली. दुपारी साडेबारा पासून ते दिसत नाही आणि फोन उचलला नाही म्हणून पुतण्याने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना काका घरीच दोरीला लटकलेले दिसले. नातेवाईक व मित्रांनी त्यांना खाली उतरवून ग्रामीन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.
तसेच जानवे येथे १ रोजी दुपारी ४ वाजता पोलीस पाटील विलास पाटील यांना अशी माहिती मिळाली की जानवे शिवारात चंद्रशेखर राजाराम पाटील यांकब्या विहिरीत एक प्रेत तरंगताना दिसत आहे. विलास पाटील , विठ्ठल भिल विनोद भिल ,संदीप भिल यांनी त्याला खाट टाकून बाहेर काढले असता तो अमोल सुनील भिल वय २१ वर्ष असल्याची ओळख पटली. अमोल २५ रोजी रात्री १० वाजता घरातून काही एक न सांगता घरतून निघून गेला होता. २७ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली होती. १रोजी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




