
Oplus_131072
अमळनेर:- तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर कायद्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कडक पावले उचलत अमळनेर व चोपडा येथील तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांना नोटिसा बजावून 24 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीवरील वाळू घाटावर केलेल्या वाळू साठ्यापोटी बारा लाख 79 हजार 344 रुपयांचा दंड ठोठावला आहे व जप्त सामग्रीपोटी एक कोटी 61 लाख 70 हजारांचा दंड ठरवण्यात आला आहे. एकीकडे दंडात्मक कारवाई होत असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार यंत्रणेला कारवाईच्या रडारवर आणले आहे. त्यानुसार अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराना, चोपड्याचे भाऊसाहेब थोरात, सावखेडाचे मंडळ अधिकारी कल्याणी पाटील, तलाठी पवन कुमार शिंगारे, निमगव्हाणचे मंडळ अधिकारी सुरेश पाटील व तलाठी निलेश पवार यांना नोटीस बजावून 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कारवाईचा निर्णय घेणार आहेत. दरम्यान कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर वाढ उपसा झाल्या होत असतानाही संबंधित तालुक्याचे अधिकारी यांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




