
Oplus_131072
अमळनेर : तालुक्यातील कपिलेश्वर येथील मंदिरावर संशयास्पद फिरणारी दोन प्रेमी युगुलांवर मारवड दामिनी पथकाने ९ रोजी दुपारी साडे बारा वाजता कारवाई केली आहे.
कपिलेश्वर मंदिरावर दोन प्रेमी युगुल आल्याची माहिती मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांना मिळाली होती. त्यांनी दामिनी पथकाचे हेडकॉन्स्टेबल रेखा ईशी ,प्रियांका शिरसाठ , परवेझ शेख , सुमित गिरासे याना पेट्रोलिंगसाठी पाठवून कारवाईचे निर्देश दिले. दामिनी पथकाला दोन तरुण आणि दोन तरुणी संशयित रित्या फिरताना आढळून आले. दामिनी पथकाने चौकशी करताच चारही जण गोंधळले. ते अमळनेर येथील होते आणि तरुणी आपल्या आईवडीलाना न सांगता मुलांबरोबर आल्याचे समजले. दामिनी पथकाने चौघांना एपीआय जीभाऊ पाटील यांच्यासमोर हजर केले आणि मुलींच्या पालकांना बोलावून त्यांना समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले तर त्या प्रेमवीरांवर ११२,११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली.




