अमळनेर:- महाराष्ट्र राज्याचे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे खान्देश दौऱ्यावर अमळनेर येथे आले असता आले त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धुळे जिल्हा पोलीस पाटील गावकामगार संघाचे कार्याध्यक्ष, पोलीस पाटील संघाचे डॉ. महेंद्र पाटील, जळगाव जिल्हा गाव कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, धरणगाव तालुका अध्यक्ष किशोर भदाणे, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी तसेच महाराष्ट्र गाव कामगार राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस पाटलांच्या समस्या तसेच अनियमित होणारे मानधन याबाबत चर्चा करण्यात येऊन येणाऱ्या काळात नियमित मानधन व पोलीस पाटलांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी संघ आपल्या पाठीशी व पोलीस पाटलांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा आशावाद यावेळी व्यक्त केला.