
धार येथे विद्यार्थ्यांना दप्तर, तर ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप…
अमळनेर:- आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमळनेर प्रहार पक्षातर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

धार येथील जि प प्राथमिक शाळा व उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाब काशिनाथ पाटील, युवक तालुकाध्यक्ष रविद्र भगवान पाटील, शहर अध्यक्ष प्रविण पाटील, शेतकरी संघटनेचे हिरामण पाटील, दिनेश पाटील, विकास पाटील, जगतराव पाटील, राहुल गोसावी, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, शिक्षीका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप…
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. ताडे, तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, शहराध्यक्ष प्रविण पाटील, युवक तालुकाध्यक्ष रविद्र पाटील, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष हिरामण पाटील, दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.





