तापी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
अमळनेर:- धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे 41 गेट उघडले असून तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीत रात्री 7 वाजता 28 घेत उघडण्यात आले होते. मात्र पाणी पातळी वाढल्याने संपूर्ण 41 गेट पूर्ण उंचीने उघडण्यात आल्याची माहिती असून तापी नदीपात्रामध्ये 56115 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणीही नदी पात्रात जाऊ नये अथवा आपले गुरढोरे नदीपात्रात सोडू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.