पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचा इशारा…
अमळनेर:- पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अक्कलपाडा प्रकल्पाच्या पोणलोट क्षेत्रातील पांझरा (लाटीपाडा ) जामखेड़ी, मालनगाव हे मध्यम प्रकल्प 100% भरले असून धरणाच्या सांडव्यावरून 10600 क्यूसेक, 2745 क्युसेक, 1350 क्युसेक अनुक्रमे असा एकुण 14695 क्यूसेक्ने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली असून पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी अक्कलपाडा धरणातून १३ रोजी रात्री नऊ वाजता १४,९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम असल्यास विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो व पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी गरजेनुसार विसर्ग वाढवला जाऊ शकतो. नदीकाठच्या गावांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणत्याही मनुष्याने नदी पात्रामध्ये जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे.