अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयातील ३०० विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वाटप करण्यात आले.
राज्य शासनाकडून अहिल्याबाई होळकर व मानव विकास योजने अंतर्गत प्रताप महाविद्यालयातील १२ वीच्या विद्यार्थिनींना पासचे वाटप करण्यात आले. यावेळी एस टी अमळनेर आगर व्यवस्थापक श्रीमती अर्चना भदाणे, आर एम भामरे, किर्तेश पाटील, चौधरी, आर. एम पाटील, उपप्राचार्य यू जी मोरे, प्रा. आर एम पारधी, प्रा. डी व्ही भलकर, प्रा. सूर्यवंशी, प्रा. दिनेश बोरसे, प्रा. आर एस महाजन, प्रा. सी आर पाटील, प्रा. जी एल धनगर, श्रीमती भामरे मॅडम, प्रा. विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.