मारवड पोलीसात सासरच्या मंडळींविरोधात दिली फिर्याद…
अमळनेर:- माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी महिलेने मारवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम अतुल पटेल यांचा विवाह मेधवा, नवागाम (गुजरात) येथील अतुल नारायण पटेल यांच्याशी २०१० मध्ये झाला होता. मात्र दोन वर्षानंतर सासरच्या मंडळींनी ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत छळ सुरू केला. आणि दोन वर्षानंतर विवाहितेला माहेरी नेवून टाकले. त्यांना १० वर्षाचा मुलगा असून २०२१ पासून त्या मुलासह अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे राहत आहेत. त्यांनी कौटुंबिक मार्गदर्शन केंद्रात अर्ज केला असता सासरच्या मंडळींनी मांडळ येथे येवून विवाहितेच्या आजी, मामा व मावशीला दमदाटी केली अशी फिर्याद मारवड पोलीसात विवाहितेने दिली आहे. त्यावरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत