
गलवाडे रस्त्यावर शेतात झाडाला दोरी बांधून घेतला गळफास…
अमळनेर:- येथील पंचायत समितीचे कंत्राटी अभियंता प्रशांत देसले यांनी गलवाडे रस्त्यावर शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपवल्याची घटना काल २२ रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील पंचायत समितीचे कंत्राटी अभियंता प्रशांत एकनाथ देसले (वय ४७) यांनी गलवाडे रस्त्यावर साने गुरुजी स्मारकाच्या ५०० मीटर अंतरावर रोडच्या उजव्या कडेला शेतात मोटार सायकलवर उभे राहून निंबाच्या झाडाला नायलॉन च्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७ वाजता उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई वडील असा परिवार आहे. दरम्यान घटनास्थळावरून चिठ्ठी मिळाल्याचे सांगण्यात येत असून त्यात नैराश्य आल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केल्याचे समजले आहे. हिरालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. उ. नि. विनोद पाटील हे करीत आहेत. दरम्यान प्रशांत देसले हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.







