
अमळनेर:- मोटार सायकल चोरीतील आरोपींकडून नऊ दुचाकी हस्तगत करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील दुचाकी चोरीच्या घटनेत अटकेत असलेले भरवस येथील चेतन कमलाकर पाटील याने आपल्या साथीदारांसह याने आपल्या साथीदारांसह अमळनेर शहरात ही अनेक दुचाकी चोरी केल्याचे समजल्याने त्यास पो. नि. जयपाल हिरे व पथकाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने नऊ मोटारसायकल काढून दिल्या. त्यात ड्रीम युगा, दोन स्प्लेंडर प्लस, हिरो कंपनीची दुचाकी, प्लॅटिना, डिस्कवर, ॲक्टिवा, सिडी डिलक्स, स्प्लेंडर या २.३३ लाख रुपयांच्या गाड्यांचा समावेश आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. जयपाल हिरे, स.फौ. संजय पाटील, पो.ना. मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे, पॉको गणेश पाटील यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




