जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे करण्यात आला गौरव…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील रहिवासी असलेले प्रा.मगन सूर्यवंशी यांना त्यांनी केलेल्या अहिराणी भाषेचे संवर्धन कार्य केल्याने जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे नाशिक येथे झालेल्या “अहिराणीना अगाजा” इ बुलेटीन,अहिराणी शब्दकोश निर्मिती प्रक्रिया समारंभात कालिदास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सूर्यवंशी हे कोकण प्रांताचे अध्यक्ष असून त्यांनी आजपर्यंत अहिराणी भाषेत विविध कवीता, लेख व साहित्यात आपला ठसा उमटविला आहे.ते राज्यातील विविध स्पर्धेत व काव्य संमेलनात हिरीरीने सहभाग नोंदवीत असतात. त्यांच्या ह्या कार्याने विविध संस्थांनी दखल घेऊन विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. नाशिक येथे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे झालेल्या पुरस्कार समारंभात अहिराणी भाषा संवर्धनात उत्कृष्ठ काम केलेल्या साहित्यिकांना कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात प्रा.मगन सूर्यवंशीना देखील गौरविण्यात आल्याने पातोंडा व पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.