अमळनेर: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने तालुक्यातील जैतपीर येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली गावात काढण्यात आली.
‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देत जनजागृती केली. यावेळी मुख्याध्यापक रविंद्र बोरसे, शिक्षक प्रदीप पाटील, संजय शिसोदे, विजय पवार, शिक्षिका कविता पाटील, सरपंच संजय सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश राजपुत उपाध्यक्ष, सदस्य ग्रापं सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.