
अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथील मूळ रहिवासी यांना नुकताच समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे भारत सरकार पुरस्कृत राजश्री छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. कुणबी मराठा समाजातील विधवा, परितक्ता, अविवाहित तरुणी व तरुणांचे विवाह लावून देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांचा सन्मान करत धुळे येथे आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, वैशाली पाटील, कैलास पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला गेला.







