सामान नासधूस करत १० हजार रुपये लंपास केल्याने पोलीसात तक्रार…
अमळनेर:- तालुक्यातील मेहेरगाव येथे पुतण्याने केली काकास मारहाण करून सामान नासधूस करत १० हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद मारवड पोलीसात देण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी धनराज भगवान चौधरी (वय ७४) रा. मेहेरगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ ऑगस्ट रोजी ते खळ्यात असताना माहिती मिळाली की, त्यांचा पुतण्या हरिश्चंद्र रुपचंद चौधरी (रा. तांबेपुरा, अमळनेर) हा त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा दगडाने ठोकत आहे. फिर्यादी घराकडे आले असता हरिश्चंद्र याने घराचा दरवाजा तोडून सामानाची नासधूस केली होती. फिर्यादी त्यास समज देण्यास गेले असता त्यांना चापताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानतंर सरपंच व इतरांनी भांडण आवरण्याचा प्रयत्न केला मात्र तो कोणालाही जुमानत नसल्याने फिर्यादी हे सरपंचाकडे निघून गेले व रात्रभर त्याच ठिकाणी थांबले. सकाळी घरात येवून पाहणी केली असता ठेवलेले १० हजार रुपये लंपास झाल्याचे व सामानाची नासधूस झाल्याचे दिसून आले. अशी फिर्याद मारवड पोलीसात देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत.