
अमळनेर:- तालुक्यातील नगाव बु. येथील चोरट्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने प्रांत व तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

नगाव बु. येथील प्रकाशगीर देवगिर गोसावी या शेतकऱ्याची नगाव खु. शिवारात शेती असून सहा महिन्यापूर्वी शेतातून केबल चोरी गेली होती. तर आता १७ ऑगस्ट रोजी विहिरीतील पाण्याची मोटर (जलपरी) चोरीला गेली आहे. नगाव शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या अनेक वस्तू चोरी जात असून या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी त्रस्त झाले आहे. तरी चोरट्यांना जेरबंद करावे या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले असून याची एक प्रत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे.







